लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे उदया तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या सुचनेनुसार अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे व सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली उदया दि . 19/11/2022 रोजी सकाळी 11:00 वा . लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवरात यापुर्वी अर्जदार यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने तक्रारी अर्जाचे निवारण होणार आहे.
तरी नागरीकांनी दाखल तक्रारी अथवा गुन्हयासंबंधाने सदर तक्रार अर्जातील अर्जदार व गैरअजदार यांनी शनिवार दि . 19/11/2022 रोजी सकाळी 11:00 वा . लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन प्रांगणात जास्तीत जास्त अर्जदार व गैरअर्जदार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.