Wednesday, May 29, 2024
Homeक्राईमलोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात…

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात…

लोणावळा (प्रतिनिधी): गुन्हा दाखल असलेल्या आरोपींचा अ फायनल अहवाल पाठविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये व सह आरोपी यांच्या कडून मिळून 1 लाख 40 हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या लोणावळा ग्रामीणच्या सहायक पोलीस निरीक्षकांवर आज लाच मागण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.
देविदास हिरामण करंडे, सहायक पोलीस निरीक्षक, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले, पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस नाईक सुनिल सुराडकर, पोलीस शिपाई भुषण ठाकुर, रियाज शेख, चालक पोलीस हवालदार दिपक दिवेकर यांच्या पथकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. मागील आठ दिवसातील मावळातील ही तिसरी घटना आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page