Friday, June 14, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा टाटा धरण येथे एकाला चाकूचे वार करून दोघांना लुटले…

लोणावळा टाटा धरण येथे एकाला चाकूचे वार करून दोघांना लुटले…

लोणावळा (प्रतिनिधी) : लोणावळा शहरातील सहारा पुल परिसरात फिरायला गेलेल्या तरुण व तरुणीला चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना रविवार दि. 22 रोजी रात्री 8:30 वा.च्या सुमारास घडली.
याबाबत सलमान उस्मान खान (वय 19, व्यवसाय शिक्षण रा. टेबल चाळ,जी वार्ड लोणावळा) याने पोलिसांत फिर्याद दिली असून.
सलमान व त्याची मैत्रिण हे काल रात्री लोणावळा ब्रिजच्या पुढे फिरायला गेले असताना त्याठिकाणी असलेल्या तीन अनोळखी व्यक्तीनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. तसेच सलमान याच्या गळ्याला चाकू लावून त्याच्या जवळील आय फोन, त्याच्या मैत्रिणी कडील सोन्याची दोन तोळ्याची चैन व चांदीची अंगटी असा 1 लाख 12 हजार 400 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला.तसेच सलमान याच्या गळ्याला आरोपींनी चाकू लावून दोघांना जबरदस्तीने पुलाखाली नेत असताना यांच्यात झालेल्या झटापटी मध्ये ते जखमी झाले. यावेळी फिर्यादिंनी सतर्रक्ता दाखविल्यामुळे मोठा अनर्थ होण्याचे टळले अशी माहिती फिर्यादी सलमान याने दिली.
सदर प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये तीन अज्ञात आरोपी विरोधात भा.द.वी. कलम 394,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page