लोणावळा दि.7 : लोणावळा ते मळवली दरम्यान अज्ञात रेल्वे खाली आल्याने एका 30 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना लोणावळा ते मळवली रेल्वे कि. मी.133/12/14 दरम्यान दुपारी 3:45 वा. च्या सुमारास उघडकीस आली.
दुपारी 3:45 वा. च्या सुमारास लोणावळा स्टेशन मास्तर यांनी लोहमार्ग पोलीस चौकी इथे फोन वरून माहिती दिली की लोणावळा ते मळवली दरम्यान रेल्वे लाईन मध्ये एक मृतदेह आढळला आहे सदर माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस चौकीचे पोलीस नाईक जाधव, कॉन्स्टेबल पालवी यांच्यासह चार हमाल घेऊन घटनास्थळी दाखल झाले व तेथील घटनेचा आढावा घेतला असता.
नरेंद्र राजेंद्र वाल्हेकर ( वय वर्ष 30, रा. मळवली, ता. मावळ, जि. पुणे ) असे मयताचे नाव असून कोणत्यातरी अज्ञात रेल्वेखाली येऊन हा अपघात झाला असल्याची माहिती पोलीस नाईक जाधव यांनी दिली. तसेच पोलीस नाईक जाधव व त्यांच्या टीमने सदर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी खंडाळा येथे नेला आणि शव विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आला आहे.