लोणावळा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे नगरसेवक सुधीर दत्तात्रय शिर्के….

0
571

लोणावळा दि. 2: लोणावळा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या रिक्त पदासाठी आज लोणावळा नगरपरिषदेत निवडणूक घेण्यात आली होती.

उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे गवळीवाडा येथील नगरसेवक सुधीर दत्तात्रय शिर्के यांच्या विरोधात भाजपा च्या नगरसेविका गौरी गणेश मावकर यांनी अर्ज दाखल केला होता.

सदर निवडणुकीत गौरी मावकर यांना 12 मते तर सुधीर शिर्के यांना 14 मते मिळाल्याने अवघ्या दोन मतांनी सुधीर दत्तात्रय शिर्के हे लोणावळा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी विजयी झाले आहेत.