
लोणावळा दि.2: लोणावळा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी ऑनलाईन निवडणूक घेण्यात आली त्यात काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका संध्या खंडेलवाल यांची उपनगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.
उपनगराध्यक्ष संजय घोणे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी कोविड 19 चे नियम लक्षात घेऊन ऑनलाईन पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. रिक्त पदासाठी संध्या खंडेलवाल यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी संध्या खंडेलवाल यांची उपनगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड जाहीर केली.
ऑनलाईन निवडणुकीस नगरसेवक श्रीधर पुजारी, राजू बच्चे, निखिल कवीश्वर, देविदास कडू, विशाल पाडाळे, सुधीर शिर्के, ब्रिंदा गणात्रा, आरोही तळेगावकर, दिलीप दामोदरे, मंदा सोनवणे, पुजा गायकवाड, रचना सिनकर, सुवर्णा अकोलकर इ. नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.