लोणावळा नगरपरिषदेच्या लोणावळा माध्यमिक विद्यालयातील एसएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार…

0
161

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय लोणावळा व लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय लोणावळा या दोन्ही विद्यालयातील इयत्ता 10 च्या परीक्षेत शाळेतून प्रथम आलेल्या विद्यार्थींनीचा पुष्प गुच्छ व चिक्की देऊन गौरव करण्यात आला.

सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्टचे माजी वाईस चेअरमन अन्वर निंबर्गी यांच्या संकल्पनेतून उर्दू माध्यमिक विद्यालयातील एस एस सी परीक्षेत शाळेत सर्वाधिक गुण मिळवून प्रथम आलेली कु.सैफी सलीम खान , द्वितीय क्रमांकावर सबिया सरवरे आलम खान तर तृतीय क्रमांक शिफा जमीर पटेल यांनी मिळविला तसेच लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय लोणावळा या शाळेत प्रथम आलेल्या कु . नाजुका गणेश गायकवाड, द्वितीय आलेल्या कु.रेश्मा मंगेश जाधव व तृतीय आलेल्या कु.सानिया मिलाल मुल्ला यांना पुष्प गुच्छ व चिक्की देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्याचबरोबर या विध्यार्थ्यांना योग्य शिक्षण व योग्य मार्गदर्शन करणारे लोणावळा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण बलकवडे सर आणि उर्दू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सईद नालमांडू सर यांनाही पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्टचे माजी वाईस चेअरमन अन्वर निंबर्गी, पत्रकार संदीप मोरे, मुख्याध्यापक सईद नालमांडू सर, मुख्याध्यापक बाळकृष्ण बलकवडे सर तसेच पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सईद सर यांनी केले तर बलकवडे सर यांनी मान्यवरांचे आभार मानले. उपस्थित मान्यवरांकडून सर्व उत्तीर्ण विध्यार्थ्यांना खाऊ वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या.