Sunday, September 24, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळा नगरपरिषदेच्या वतीने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटीजेन तपासणी...

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटीजेन तपासणी…

लोणावळा दि.7: लोणावळा शहराला कोरोना मुक्त करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव,मुख्याधिकारी सोमनाथ जाधव व अन्य अधिकारी आणि लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने आज सकाळी 7 पासून लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली.

त्यामध्ये सकाळी बारा वाजेपर्यंत 170 नागरिकांची रॅपिड अँटीजेन चाचणी केली असता त्यापैकी 25 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले आहेत. ही खूप धक्कादायक बाब आहे. हे मिळून आलेले 25 पॉझिटिव्ह रुग्ण बाजारात फिरत असतेतर त्यांच्यामुळे आणखी लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे नागरिकांनी विना मास विनाकारण घराबाहेर निघू नका, ज्याला कोणाला सर्दी, ताप अशी लक्षणे आढळ्यास त्वरित अँटीजेन तपासणी करून घ्यावी, कोणीही घाबरून जाऊ नये,शहराला कोरोना पासून मुक्त करण्यास नागरिकांनी सहकार्य करावे तसेच “ब्रेक द चैन ” ह्या अंतर्गत मावळात 7 मे पहाटे 1 पासून 12 मे रात्री 12 वाजेपर्यंत लॉक डाऊन घोषित केला असून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

ते निर्बंध पाळून प्रशासन व नागरिकांनी कोरोना साखळी तोडण्यास सहकार्य करावे तसेच कोणीही दुकानदार विना मास सेवा देताना प्रथम आढळ्यास त्याला दंड आकारण्यात येईल व दुसऱ्यांदा आढळल्यास त्याचे दुकान सील करण्यात येईल याची सर्व अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव ध्वनी यंत्रनेमार्फत वारंवार करत आहेत.

तरी नागरिकांनी विना मास घराबाहेर पडू नये, जास्त गरजेचे असल्यास घराबाहेर पडावे आणि तोंडाला मास लावायचे नविसरता, सॅनिटायझरचा वापर करत बाजारात गर्दी करण्याचे टाळावे, स्वतः सुरक्षित रहा व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा अशा सूचना करण्यात येत आहेत.

- Advertisment -