लोणावळा दि.11: लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियाना ‘ अंतर्गत “वृक्ष संगोपन दिंडी” चे आयोजन करण्यात आले होते . या दिंडीमध्ये शहरातील सर्व शाळा, सामाजिक संस्था, महिला बचत गट, जेष्ठ नागरिक संघ, नगरसेवक – नगरसेविका आणि नागरिक पारंपरिक वेशभूषेत मोठया संख्येने सहभागी झाले होते.
त्यातच वेगवेगळ्या वेशभूषेतील विध्यार्थी हे ह्या दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले. सदर दिंडीचे आयोजन मावळा चौक ते छत्रपती शिवाजी चौक असे पायी दिंडीचे नियोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वसुंधरेच्या प्रतिमेस तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करण्यात आले.
झाडे लावा, झाडे जगवा, वृक्षाचे संगोपन करा अशा घोषणा देत वृक्ष संगोपन दिंडीची सांगता भाजी मार्केट येथे आयोजित सभेत करण्यात आली. नियोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांनी दिंडीत सहभागी असलेल्या सर्व शालेय विध्यार्थी, शिक्षक वर्ग, सामाजिक संस्था, महिला बचत गट, नगरसेविका – नगरसेवक आणि जेष्ठ नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले.
नंतर नगरपरिषदेच्या वतीने वृक्षांची लागवड व संगोपन करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी जास्तीत जास्त झाडे लावा असे आवाहन सर्व नागरिकांना केले.त्याचबरोब भारत माताकी जय अशा घोषणा देत “माझी वसुंधरा “अभियानांतर्गत ”वृक्ष संगोपन दिंडीची ” सांगता झाली.