Friday, June 14, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालयात शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न…

लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालयात शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय भांगरवाडी येथे शाला स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.
उर्दू माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 8 वी,9 वी व 10 वी. च्या विध्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदविला. कागद,पुठ्ठा,प्लास्टिक बॉटल आदी च्या साहाय्याने तयार केलेले प्रयोग प्रदर्शित केले तसेच आपण सादर केलेल्या प्रयोगाची उत्तम अशी माहिती ही प्रेक्षकांना पुरविण्यात आली.
या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षक म्हणजे कागद, पुठ्ठा व प्लास्टिक बॉटल यांपासून विध्यार्थ्यांनी तयार केलेले बायोगॅस प्रकल्प, सोलर पॅनल प्रकल्प तसेच स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या चिमणीचा प्रकल्प,वाटर कुलर प्रकल्प, सेटेलाईट यांसारखे अनेक प्रकल्प व त्याबाबतची माहिती पुरविण्यात आली.हे प्रदर्शन पाहण्याकरिता लोणावळा नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळांतील विध्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.सदर विज्ञान प्रदर्शनासाठी विध्यार्थ्यांनी परिश्रम घेतले तर, विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका हिना कौसर ताजमत यांनी विध्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page