Monday, April 15, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालयातील विध्यार्थ्यांना 15 सायकली वाटप…

लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालयातील विध्यार्थ्यांना 15 सायकली वाटप…

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या उर्दू माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ बुधवार दि.21 रोजी उत्सहात पार पडला. निरोप समारंभाचे औचित्य साधून औरंगाबाद येथील उद्योजक हाजी अब्दुल जबारसेठ बागवान, हाजी युनूससेठ बागवान व शाहदा वाळे यांच्या तर्फे व सोलापूर येथील इरफान एस एम यांच्या विशेष प्रयत्नाने विद्यालयातील इयत्ता सातवी, आठवी व नववी या वर्गातील गरजू विध्यार्थ्यांना 15 सायकली वाटप करण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ बिंद्रा अनिष गणात्रा ह्या होत्या. प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई शहर कार्याध्यक्ष सिराज अहमद, अल्पसंख्यांक सेल चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुलतान मालदार, परभणी येथील सय्यद सलीन बागवान आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांना अध्यक्षा बिंद्रा गणात्रा यांच्या हस्ते शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी हाजी मन्यार, रफीक शेख, फिरोज शेख, जाकीर खलिफा, सईद खान, सर्फराज शेख, तारीख बागवान, वाजीद मुस्तफी नदवी, डॉ. सादिक नदवी, समीर सय्यद आदी मान्यवर, पालक व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुन्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी स्वखर्चातून सायकली भेट दिल्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची अधिक ओढ निर्माण होईल व हेच विध्यार्थी पुढे शिकतील आणि स्वतः चे व शाळेचे नाव मोठे करतील असे मनोगत व्यक्त करत फिरोज शेख यांनी पाहुण्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सईद नल्लामांडू सर यांनी केले. व उपस्थितांचे आभार मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page