Wednesday, June 7, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयातील गरजू विध्यार्थ्यांना कोटक ग्रुपकडून सायकली भेट…

लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयातील गरजू विध्यार्थ्यांना कोटक ग्रुपकडून सायकली भेट…

लोणावळा (प्रतिनिधी):कोटक ग्रुपच्या वतीने लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयातील 18 गरजू विद्यार्थ्यांना अँबी व्हॅली येथे मोठ्या सन्मानपूर्वक मोफत सायकली वाटप करण्यात आल्या.
शाळा व घर यामधील अंतर म्हणजे विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील अडथळाच असल्याचे लक्षात घेऊन कोटक ग्रुपच्या वतीने अठरा गरजू विध्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी मोफत सायकलीचे वाटप करण्यात आल्या. घर ते शाळा यातील प्रवास आता सुखकर होणार असल्याने विध्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
आनंद व्यक्त करताना “आम्हाला आज खूप भारी वाटतंय. आमच्या सायकली खूप छान आहेत. शाळा दूर असली तरी आता चिंता नाही. असे विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
तसेच शाळेच्या वतीने कोटक संस्थेचे आभार व्यक्त करताना शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण बलकवडे सर यांनी “कोरोना काळात विद्यार्थी हा शाळा, अभ्यास व खेळापासून दुरावला आणि मोबाईलला चिकटला आहे, परंतु सायकल भेटीने तो पुन्हा शाळा, अभ्यास व खेळाकडे आकर्षित होण्यास मदत होईल असे मनोगत व्यक्त केले.

You cannot copy content of this page