Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयात क्रीडा महोत्सव संपन्न…

लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयात क्रीडा महोत्सव संपन्न…

लोणावळा:(प्रतिनिधी) : लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयात क्रीडा महोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. तर त्याचा बक्षीसवितरण व विविध गुणदर्शन सोहळा दिनांक 23 डिसेंबर रोजी मोठया दिमाखात पार पडला.
दिनांक 21 डिसेंबर रोजी क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन विद्यालयाचे माजी शाळा समिती सभापती देविदास भाऊसाहेब कडू यांच्या शुभहस्ते मैदान पूजन व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले.
विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध वैयक्तिक व सांघिक स्पर्धाबरोबर रांगोळी, चित्रकला इत्यादी स्वच्छता व पर्यावरण जनजागृतीपर स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या.
स्नेहसंमेलनाचा अंतिम टप्पा म्हणजे बक्षीसवितरण व विविध गुणदर्शन सोहळा दिनांक 23 डिसेंबर रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे माजी शाळा समिती सभापती देविदास भाऊसाहेब कडू यांनी भूषविले. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य व मनशक्ती केंद्राचे ज्येष्ठ साधक नामदेव फापाळे हे लाभले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपूजन व दीप प्रज्वलनाने झाली तर विद्यार्थी आणि पालकांच्या स्वच्छता व पर्यावरण जनजागृतीसाठी वसुंधरा प्रतिज्ञा घेण्यात आली. विजयी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र, पदके व ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आल्या. सदर कार्यक्रमात आदित्य बिर्ला ग्रुपच्यावतीने मोफत 25 सायकल वाटप करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक बालकृष्ण बलकवडे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती राणे मॅडम व पारीठे सर यांनी केले तर आभारप्रदर्शन पठाण सर यांनी केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page