Friday, June 27, 2025
Homeपुणेलोणावळालोणावळा नगरपरिषद शाळांमध्ये 'घर घर संविधान' उपक्रम..

लोणावळा नगरपरिषद शाळांमध्ये ‘घर घर संविधान’ उपक्रम..

विद्यार्थ्यांना उद्देशिकेची फ्रेम वितरीत; घटनेचे महत्त्व सांगताना मुख्याधिकारी अशोक साबळे यांचे मार्गदर्शन..

प्रतिनिधी : श्रावणी कामत.

लोणावळा : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या ‘घर घर संविधान’ मोहिमेअंतर्गत लोणावळा नगरपरिषदेमार्फत विद्यार्थ्यांमध्ये संविधान जागृती करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत नगरपरिषदेच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची उद्देशिकेची फ्रेम वितरीत करण्यात आली.

हा कार्यक्रम गुरुवारी (दि. २६ जून २०२५) दुपारी १२ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा क्र. १ येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. अशोक साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी सूत्रसंचालन व प्रास्ताविक शिक्षक अमोल साबळे यांनी केले.

या वेळी मार्गदर्शन करताना साबळे यांनी संविधानातील महत्त्वाच्या बाबी आणि उद्देशिकेचे प्रास्ताविक विद्यार्थ्यांपुढे मांडले. त्यांनी घटनेतील लोकशाही, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

कार्यक्रमात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना उद्देशिकेच्या फ्रेमचे वितरण करण्यात आले. त्यानंतर नगरपरिषदेच्या सर्व शाळांतील मुख्याध्यापकांना भारतीय संविधानाची अधिकृत प्रत देण्यात आली.

या कार्यक्रमास उपमुख्याधिकारी श्री. शरद कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष खाडे, तसेच नगरपरिषदेचे इतर अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख उपस्थित शिक्षकांमध्ये चित्रा जोशी, प्रतिभा दरेकर, लतिफ खान, भागवत सर, ज्योती चव्हाण, नंदा तादळे, सविता शिंदे, संतोष जगताप, सुचेता ऐखे, शितल बच्चाव, रेखा ओव्हाळ, ज्योती पालवे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका प्रतिभा दरेकर यांनी मानले.

- Advertisment -

You cannot copy content of this page