Friday, February 23, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा नगरपरिषद सेवक वर्ग सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष बलकवडे तर सचिवपदी जितेंद्र...

लोणावळा नगरपरिषद सेवक वर्ग सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष बलकवडे तर सचिवपदी जितेंद्र राऊत…

लोणावळा (प्रतिनिधी) : लोणावळा नगरपरिषद सेवक वर्ग सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष बलकवडे , उपाध्यक्षपदी चेतन सारवान , खजिनदारपदी अनिल अकोलकर तर सचिवपदी जितेंद्र राऊत हे विजयी झाले आहेत .या सर्व विजयी उमेदवारांना प्रत्येकी 11 मते मिळाली .
मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात वडगाव मावळ येथे आर.के.निखारे अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी दोन अर्ज आले होते . यामध्ये सुभाष ज्ञानेश्वर बलकवडे यांना 11 मते पडली तर सुनिल काशिनाथ दहिभाते यांना 4 मते पडली . उपाध्यक्ष पदासाठी दोन अर्ज आले होते.
यामध्ये चेतन विनोद सारवाण यांना 11 मते पडली तर अंकुश बाबुराव खिल्लारे यांना 4 मते पडली . खजिनदार पदासाठी दोन अर्ज आले होते . यामध्ये अनिल अशोक अकोलकर यांना 11 मते पडली तर अनंता महादु टेमघरे यांना 4 मते पडली . सचिव पदासाठी दोन अर्ज आले होते यामध्ये जितेंद्र बबन राऊत यांना 11 मते पडली तर अरूण रामभाऊ मातेरे यांना 4 मते पडली.
यावेळी संचालक सुर्यकांत हाळुंदे , संतोष गिरी , मुरलीधर कांबळे , बबन कांबळे , खंडु बोभाटे , स्वाती गायकवाड , जयश्री राणवे , व्यवस्थापक मुरलीधर गावकर , लिपिक संदिप लांडगे , माजी चेअरमन विलास जाधव , राजेश सपकाळ , मारूती मराठे , बाळु दळवी , अनिल लोंढे , संतोष मालपुटे आदी जन उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page