लोणावळा : दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत लोणावळा नगर परिषदेच्या वतीने शहरातील सर्व पथविक्रेते व फेरीवाले यांच्या साठी मोबाईल app द्वारे सर्वेक्षण करण्याचे काम विनामूल्य सुरु आहे.
या कामासाठी लोणावळा नगर परिषदेने “अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था पुणे” या संस्थेची नियुक्ती केलेली आहे. हे सर्वेक्षण अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था पुणे संस्थेने नियुक्त केलेल्या सर्वेअर मार्फतच केले जाणार आहे.
फेरीवाल्यांचे सर्वेक्षण अभियान हे संपूर्ण विनामुल्य असून ह्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नगर परिषद व संस्था आकारात नाही याची सर्व फेरीवाल्यांनी नोंद घ्यावी.तसेच या सर्वेक्षण करण्यासाठी कोणी आपणास पैशाची मागणी केल्यास नगरपरिषदेस कळवावे,सर्व फेरीवाल्यांनी सर्वे दरम्यान आपणास मागणी केलेली कागदपत्रे हि NULM विभाग-लोणावळा नगर परिषद किंवा संस्थेने नियुक्त केलेल्या सर्वेअर यांच्याकडेच जमा करावीत असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सुरेखा जाधव व नगरसेवक श्रीधर पुजारी यांनी केले आहे.