Saturday, July 27, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा नगरपालिका व विज महावितरनाच्या हलगर्जीपणा मुळे नागरिकांना पाण्याच्या टंचाईचे संकट..

लोणावळा नगरपालिका व विज महावितरनाच्या हलगर्जीपणा मुळे नागरिकांना पाण्याच्या टंचाईचे संकट..

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेचा हलगर्जीपणा त्यामुळे होत आहेत लोणावळा शहरातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल.तौक्ते वादळाचा तडाखा लोणावळा शहरालाही बसला आहे. लोणावळा नांगरगाव परिसरातील बहुतेक विजेचे खांब जमीनदोस्त झाले त्यामुळे शहरातील विज पुरवठ्याबरोबर पाणी पुरवठाही खंडित झाला आहे.गेली पाच ते सहा वर्ष वारंवार शहरातील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. याला मुख्य म्हणजे लोणावळा प्रशासन जबाबदार आहे. वारंवार होण्याऱ्या विज खंडित प्रकरणामुळे शहरातील पाणी पुरवठा खंडित होणे यातून प्रशासन किती गंभीर आहे याचा अंदाज लागतो.

लोणावळा विद्युत महावितरण मंडळाला वारंवार पत्रके देऊनही शहरातील रखडलेले भूमिगत केबलचे काम अद्याप अर्धवट आहे याकडेही कोणत्याही नगरसेवकांचे लक्ष नाही आणि अनेक वेळा विद्युत प्रवाह नसल्यामुळे शहरातील नागरिकांना अंधारात रहावे लागत आहे.कारण कुणाला काही पडलेच नाही.शहरातील नागरिकांना वारंवार होणाऱ्या त्रासाचे निवारण करण्यात प्रशासन कमी पडत असले तरी त्यामध्ये विद्युत महावितरण मंडळालाही कोणी काम पूर्ण का झाले नाही याचा जाबही विचारला नाही किंवा त्याचा पाठपुरावा ही केला नाही.त्या संदर्भात विद्युत महावितरण महामंडळाला कोणी जाब ही विचारत नाही.

विद्युत महामंडळाकडून फक्त ऐनवेळी झाडे पडली किंवा कुठेतरी विज वाहिन्या तुटल्या तरच कामे करतात अन्यथा येणाऱ्या संकटाचे आधीच नियोजन करण्यासाठी आधीच तयारी करण्यात लोणावळा नगरपरिषद व विद्युत महावितरण महामंडळ लोणावळा विभाग कमी पडत आहे. किंवा यांसर्वांना कुणाची काही काळजीच नाही मग हा यांचा निष्काळजी पणा नाहीतर काय आहे. या सर्व बाबींबद्दल यांना कोणी जाब विचारणार आहे का. मुख्य म्हणजे शहरातील पाणी पुरवठ्याचे सर्व नियोजन नगरपरिषदेचे आहे आज कधीपर्यंत लोणावळ्यातील नागरिकांना हा त्रास सोसावा लागणार आहे.120 कोटीच्या बजेटमध्ये एका जनरेटरचे नियोजन का करत नाही आणि भूमिगत केबल टाकल्यानेही ह्या समस्येचे कायमचे निवारण होऊ शकते त्यासाठी प्रशासनाने दखल घेणे तितकेच गरजेचे आहे.

आज आलेले तौक्ते वादळाचे संकट हे थोडक्यात निभावले असले तरी प्रत्येक पावसाळ्यात येणारे वारे व मुसळधार पाऊस यामध्ये अनेक वेळा शहरातील नागरिकांना पाण्याच्या व विज खंडीतला समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यासंदर्भात लोणावळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी व पाणी खात्याचे सभापती सुधीर शिर्के यांना विचारणा केली असता पाणी पुरवठ्यासाठी जेनरेटरचा प्रस्ताव नगरपरिषदेच्या सभेत मांडला असून पुढील काळात शहरातील नागरिकांना विज पुरवठ्या अभावी पाण्याची समस्या येणार नाही अशी माहिती दूरध्वणी मार्फत देण्यात आली आहे. तसेच सध्या दोन दिवसांपासून विस्कळीत असलेला पाणी पुरवठा आज सायंकाळ पर्यंत सुरु करण्याचे प्रयत्न करू असे ही यावेळी त्यांनी सांगितले.

- Advertisment -

You cannot copy content of this page