Friday, December 8, 2023
Homeक्राईमलोणावळा परिसरात बंगला फोडून चोरी करणारा आरोपी लोणावळा शहर पोलिसांच्या ताब्यात...

लोणावळा परिसरात बंगला फोडून चोरी करणारा आरोपी लोणावळा शहर पोलिसांच्या ताब्यात…

लोणावळा शहरातील परिसरात रात्रीच्या वेळी बंद बंगले फोडून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला लोणावळा शहर पोलिसांनी सापळा रचून केली अटक. वसीम सल्लाउद्दीन चौधरी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.7/6/2021 रोजी आरोपी वसीम हा लोणावळा बाजारपेठेत सेकंड हॅन्ड मोबाईल फोन विक्री करत असल्याची खबर लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त सूत्रांकडून मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी लोणावळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकास आरोपी वासिम याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. सूचना मिळताच लोणावळा गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक नितीन सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल अजीज मेस्त्री, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खैरे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज मोरे यांनी वेषांतर करून आरोपीच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून त्यास अटक केली.

त्याकडे अधिक चौकशी केली असता मागील पंधरा दिवसांपूर्वी तुंगार्ली येथील गोल्ड व्हॅली सेक्टर ( C ) मधील टिटोस नावाचा बंद बंगला रात्रीच्या वेळी फोडून त्यातील सोन्याच्या दोन अंगठ्या व दोन मोबाईल फोन लंपास केल्याचे चौकशीत समोर आले. तसेच चोरी करतेवेळी वापरलेली मोटर सायकल ही वरसोली येथून चोरी केली असल्याची कबुली वसीम याने दिली.

आरोपी वसीम सल्लाउद्दीन चौधरी यास पोलिसांनी अटक केली असून त्याने चोरी केलेली मोटर सायकल, दोन सोन्याच्या अंगठ्या व दोन मोबाईल फोन असा एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर हे करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page