लोणावळा पुणे लोकल सुरु करण्यासाठी, भाजपा च्या वतीने आंदोलन…

0
526

लोणावळा : दि.10 लोणावळा स्टेशन वरील लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना असलेला हाॅल्ट बंद करून तो खंडाळ्यात नेण्यात आला.तो हॉल्ट पुन्हा लोणावळा स्टेशन वर यावा आणि बंद असलेल्या लोणावळा पुणे लोणावळा लोकलची सेवा पुन्हा सुरु करण्यात यावी यासाठी लोणावळा भाजपाच्या वतीने आंदोलन.

लांब पल्याच्या रेल्वे गाड्याना खंडाळा रेल्वे स्टेशनवर हॉल्ट दिल्यामुळे गुजरात, राजस्थान ,उत्तर प्रदेश इ.उत्तर भारतातील राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना खाजगी अथवा भाड्याच्या वाहनांनी खंडाळा येथे गाडी पकडण्यासाठी जावे लागते. यामध्ये अनेकदा ट्राफिक जाम मुळे लोकांची गाडी सुद्धा चुकते. शारीरिक,आर्थिक व मानसिक मनस्ताप होतो.

वृद्ध ,लहान मुले व अपंग व्यक्तींना जो त्रास होतो या करिता लांब पल्ल्यांच्या गाड्यांना लोणावळा येथे पुन्हा हॉल्ट सुरू करणे, लोकल गाड्या सुरू करणे, आणि सिजन तिकीट (मासिक पास) देणे बंद केलेले असल्यामुळे दहा-बारा हजार रुपये वेतन कामगारांना पुणे ,चिंचवड, पिंपरी या शहरात ये-जा करून नोकरी करणाऱ्या तरुणांना.

आपली नोकरी टिकविण्यासाठी रोज सरासरी दोनशे रुपये खर्च करून कामावरती जावे लागते. त्यांच्या या समस्येचे समाधान करण्याकरता लोकल ट्रेन चालू होणे आवश्यक आहे तसेच मासिक पास देणे लवकर सुरू केले पाहिजे या मागण्यांकरीता भारतीय जनता पार्टी,लोणावळा तर्फे आंदोलन करून स्टेशन मास्तरांना याबाबत निवेदन देण्यात आले.त्यावेळी लोणावळा भाजपा चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.