लोणावळा महामानवांच्या समूहशील्पाचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात…..

0
617
लोणावळा दि. 11: लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषद कार्यालयाजवळ उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले आणि संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या या समूहशिल्पाच्या कामाचा आढावा आरपीआय (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, माजी उपनागराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्रीधरजी पुजारी, नगरसेवक विशाल पाडाळे, माजी नगरसेवक राजाभाऊ खळदकर यांनी ठेकेदार राजीव राजकोंडावार यांच्याकडून घेतला. यावेळी श्रीधर पुजारी यांनी संबंधित ठेकेदार यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
सदर समूहशिल्पाचा लोकार्पण सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी करण्याचा मानस सूर्यकांत वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केला.