लोणावळा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर शिल्प नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन रामदास आठवले यांच्या हस्ते संपन्न…

0
163

लोणावळा दि.5 : शहरातील विविध विकास कामांचे भूमी पूजन केंद्रीय न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

लोणावळा नगरपरिषद हद्दीतील डॉ. बाबासाहेब डहाणूकर रुग्णालय येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाचे नूतनिकरणाच्या कामाचे भूमी पूजन व माता रमाबाई सांस्कृतिक भवनाचे उदघाट्न केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन आर पी आय ( आठवले ) च्या वतीने करण्यात आले होते त्यावेळी बोलताना आठवले म्हणाले उदया असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे आंबेडकर समाज बांधव कोटींच्या संख्येने दर्शनासाठी व अभिवादन करण्यासाठी गर्दी करत असतात तर सध्या कोरोना चे सावट असल्यामुळे सर्व समाज बांधवांनी दादर येथे गर्दी नकरता आपापल्या घरीच अभिवादन करावे, आंबेडकरी समाजाने गटा तटाचे राजकारण थांबवावे आर पी आय हा पक्ष कोणाच्या नेतृत्वाखाली आहे याचे भान ठेवावे तसेच मोदी सरकार हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे सरकार असून हे बाबासाहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करणारे सरकार आहे.

हे सरकार दलित समाजाला सहकार्य करत असून शेतकरी बांधवांच्या हितासाठी तीन कृषी कायदे रद्द केले आहेत तरी शेतकरी बांधवांनी आपले आंदोलन मागे घ्यावे असेही आवाहन त्यांनी केले आहे. तसेच उत्तर प्रदेश मध्ये 1 लाख दलित बांधवांची सभा घेण्याचे प्रयोजन असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असला तरी काही राज्यांत त्याला स्थान नसून केंद्र सरकार मधून मोदीला हाकलून लावणे अवघड आहे पण अश्यकही आहे. सत्तेमधून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बाहेर करावे आणि येत्या मार्च व एप्रिल मध्ये हे सरकार पडण्याची शक्यता असल्याचे संकेत त्यांनी आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिले.

पत्रकार परिषद पार पडल्या नंतर सर्व मान्यवर आयोजित कामांच्या शुभारंभासाठी दाखल झाले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाच्या नूतणीकरणाचे भूमिपूजन आणि माता रमाबाई सांस्कृतिक भवनाचे उदघाटन रामदास आठवले यांच्या हस्ते संपन्न झाले.

आयोजित सभेत नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांना लोणावळा भूषण पुरस्काराणे मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते गौरवीण्यात आले.

या सभेत मार्गदर्शन करताना आठवले यांनी एक छानशी कविता सांगितली “मी फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा फुलवणार आहे मळा, आज माझा भरून गेलाय गळा, नरेंद्र मोदींचा सर्वांना आहे लळा, आता तुम्ही त्यांच्याकडून आमच्याकडे वळा, माझ्या हृदयात रुतून बसलं आहे माझ्या भीमाचं नाव कारण आपल्या सर्वांचं आहे लोणावळा गाव, मला नाही कशाची हाव पण मी घालणार आहे पाकिस्तान वर घाव ” अशी हास्यास्पद कविता ऐकून सर्व उपस्थित मंडळींच्या चेहऱ्यावर हास्य उमटले व टाळ्यांच्या गजरात सामाजिक न्याय व अधिकारीयता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी लोणावळा शहरातील नगरसेविका नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.