Sunday, July 14, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा रोटरी क्लबच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी अध्यक्ष पदी जयवंत नलावडे विराजमान..

लोणावळा रोटरी क्लबच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी अध्यक्ष पदी जयवंत नलावडे विराजमान..

लोणावळा रोटरी क्लब यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण करीत आहे. या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष क्लब साजरे करणार आहे. लोणावळा शहरातील बांधकाम व्यवसायिक जयवंत नलावडे यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आलेली आहे.यांचा पदग्रहण सोहळा लोणावळा शहरातील पंचतारांकित हॉटेल फरियाज रिसोर्ट येथे संपन्न झाला.सदर सोहळ्यासाठी रोटरी ३१३१ चे प्रांतपाल पंकज शहा, उपप्रांतपाल बलवीर चावला ,डिस्ट्रिक्ट फर्स्ट लेडी प्रिया शहा या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.


सदर सोहळ्यासाठी फाउंडेशन डायरेक्टर पंकज पटेल, डायरेक्टर इन्व्हरमेंट समीर रुपानी, क्लब फस्ट लेडी प्रतिभा नलावले यांच्यासह रोटरी क्लब कार्यकारणी संचालक व रोटीरीय उपस्थित होते.रोटरी क्लबची सूत्रे २०२०-२१ चे अध्यक्ष राजेश गायकवाड यांनी नूतन अध्यक्ष जयवंत नलावडे यांच्याकडे सुपूर्त केली. गतवर्षी करोनाची गंभीर स्थिती असतानाही उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अध्यक्ष राजेश गायकवाड व त्यांचे कार्यकारी मंडळ यांचे विशेष कौतुक करण्यात आले.


नूतन अध्यक्ष जयवंत नलावडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले या वर्षी सुवर्ण मोहत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यासाठी अनेक सामाजिक संस्था आमच्या सोबत आहेत, त्यांच्या मदतीने सामाजिक, शैक्षणिक, उद्योगिक उपक्रम राबविन्यात येणार आहेत.लोणावळा शहरातील सुप्रसिद्ध डॉ. डॉली अग्रवाल यांनी करोना काळात केलेल्या कामाची विशेष दखल घेत रोटरी क्लब व क्लब महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्सिजन कंसिस्टर संच देऊन सन्मानित करण्यात आले.

यावर्षी रोटरी इंटरनॅशनलची थीम “सेवेतून लोकांचे जीवन बदलणे” या उद्देशाने समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.रोटरी फाउंडेशनला भरीव मदत करण्याचे आश्वासन फाउंडेशन डायरेक्टर कौस्तुभ दामले यांनी केले.या कार्याची सुरवात स्व:त पासून केली.


मेंबरशिप डायरेक्टर उदय पाटील यांनी लोणावळा शहरातील मान्यवरांना रोटरीत प्रवेश दिला. रोटरीत समाजातील वकील, डॉक्टर, उद्योजक यांचा प्रवेश होणार असल्याचे संकेत दिले.लोणावळा शहरातील डॉ. डॉली अग्रवाल, ऍड मोनाली कुलकर्णी शेलार,आशिष मेहता, श्याम पवार,अनिल तंतरपाळे यांनी रोटरीत प्रवेश केला. प्रांतपाल पंकज शहा यांनी या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे मन:पूर्वक कौतुक केले.लोणावळा पर्यटन नगरी आहे त्यासाठी पर्यटन पॉईंटवर लोणावळा रोटरीने कायम स्वरूपी स्मरणात राहील असा उपक्रम राबवावे असे आवाहन केले. क्लब राबवित असलेल्या प्रकल्पासाठी डिस्ट्रिक्ट कडून भरीव मदत केली जाईलअसे सांगितले.

यावर्षी सर्व रेकॉर्ड ब्रेक होऊन नवीन इतिहास घडविण्यात येईल असे उपप्रांतपाल बलविर चावला यांनी व्यक्त केले.डिस्ट्रिक्ट फर्स्ट लेडी प्रिया शहा यांनी महिलांनी रोटरीत सहभागी होण्याचे आवाहन केले डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स २०२२ मध्ये सर्वांनी कुटुंबासह सहभागी व्हावे असे सांगितले.

नूतन कार्यकारणी आय पी पी राजेश गायकवाड,सचिव अजय अरगडे, खजिनदार गोरख चौधरी, आय टी डायरेक्टर पुंडलिक वानखेडे, पी आर डायरेक्टर बापू पाटील,फौंडेशन डायरेक्टर कौस्तुभ दामले, मेम्बरशीप डायरेक्टर उदय पाटील, युथ डायरेक्टर मुस्तफा कॉन्ट्रॅक्टर, प्रोजेक्ट डायरेक्टर श्रीकृष्ण वर्तक, धनंजय साखरेकर, क्लब अडमीन नितीन कल्याण, सार्जंट अन आर्म दिलिप पवार, ट्रेनर खेमसिंग चौहान, रवींद्र कुलकर्णी.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू पाटील यांनी केले. आभार कौस्तुभ दामले यांनी मानले.

- Advertisment -

You cannot copy content of this page