Sunday, April 21, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा व्ही पी एस महाविद्यालयाचा 12 वी चा निकाल 99.06 % वर...

लोणावळा व्ही पी एस महाविद्यालयाचा 12 वी चा निकाल 99.06 % वर…

व्ही पी एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लोणावळा. एच एस सी (12 वी ) विज्ञान व वाणिज्य परीक्षा 2020 चा निकाल 99.06 % लागला आहे. एच एस सी परीक्षा 2020 साठी महाविद्यालयातील विज्ञान मधून एकूण 214 विद्यार्थ्यांपैकी 212 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, वाणिज्य मधून 664 विध्यार्थी परीक्षेस बसले असता एकूण 638 विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

त्याचप्रमाणे विज्ञान मधून 99.06% तर वाणिज्य साठी 96.08% असा निकाल लागला आहे. व्ही पी एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान विषयातील पहिले पाच विध्यार्थ्यांपैकी कुमारी मराठे अर्पिता गणपत हिने पहिल्या क्रमांकासाठी एकूण गुण 557, प्रमाणे शेकडा गुण 85.69.% मिळविले आहेत. दुसऱ्या क्रमांकासाठी कुमार खिलारे समर्थ प्रवीण, याने एकूण गुण 547,प्रमाणे शेकडा गुण 84.15% मिळविले , तसेच तिसऱ्या क्रमांकासाठी कुमारी देशमुख माधुरी अशोक, एकूण गुण 538, तर एकूण शेकडा गुण 82.76 %, तसेच चौथ्या क्रमांकावर कुमार गोरेगावकर तन्मय दिपक, ह्याने एकूण गुण 537 प्रमाणे एकूण शेकडा गुण 82.61% मिळविले व कुमारी भिवडे श्रुष्टि एकनाथ हीने एकूण गुण 519 मिळविले असून एकूण शेकडा गुण 79.84 % मिळवत पाचवा क्रमांक नोंदविला आहे.

त्याचप्रमाणे वाणिज्य मधील प्रथम पाच विध्यार्थ्यांपैकी कुमारी . खिलारे आरती माधव हिने 578 गुण प्रमाणे 88.92 % गुण मिळवत पहिला क्रमांक, तर कुमार शिरसाठ राजेश गोपाळ ह्याने एकूण गुण 577 प्रमाणे 88.76% गुण मिळवत दुसरा क्रमांक आणि कुमारी ढाकोल मधुरा शंकर हिने एकूण 557 प्रमाणे 85.69% टक्केवारी मिळवत तिसरा क्रमांक मिळविला आहे. त्याच प्रमाणे एकूण गुण 556 प्रमाणे, 85.54% शेकडा गुण मिळवत कुमार पठाण इम्रान ताज्जूद्दीन याने चौथा क्रमांक तर कुमार चौहान कुंवरसिंग सुरेशसिंग याने एकूण गुण 555 प्रमाणे 85.38% शेकडा गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकाविला आहे. परीक्षेत प्रशंसनीय गुण मिळवून ह्या विध्यार्थ्यांनी आपल्या बरोबर महाविद्यालयाचेही शीर उंचाविले आहे. सदर गुणवत्ते बद्दल विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार जोरी सर आणि सर्व शिक्षक वर्ग यांच्यावतीने सर्व विध्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

- Advertisment -

You cannot copy content of this page