Saturday, September 21, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने ठोस पाऊल उचलणे गरजेचे.....

लोणावळा शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने ठोस पाऊल उचलणे गरजेचे…..

(मावळ प्रतिनिधी )
लोणावळा : दि. 28, शहरात आज एका दिवसात कोरोनाचे 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असता. लोणावळा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 242 वर पोहोचली असून यापैकी आजपर्यंत एकूण 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 132 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

तसेच सध्या शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 98 झाली असून शहरातील कोरोना रुग्ण बरे होण्याच्या तुलनेत मृत्यूची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन खुलल्यामुळे शहरात येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे.त्यात नागरिकांनाही कोरोनाचा विसर पडल्याचे दिसत आहे.

मावळात व लोणावळा शहरातील पर्यटन स्थळांवर शासनाने घातलेल्या बंदीकडे दुर्लक्ष करून पोलीस प्रशासनाच्या चेक पोस्टला चुकांडी देऊन छुप्या मार्गाने हे पर्यटक सर्रासपणे शहरात दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा अंदाज मात्र नाकारता येत नाही.

कारण आज दोन महिन्यापूर्वी शहरात एकही कोरोना रुग्ण आढळला नव्हता त्यांनतर अगदी संत गतीने शहरात कोरोनाचा शिरकाव झाला व आजच्या मितीला जास्त प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. ही सध्यस्थिती व सर्व बाबींचा विचार करून कोरोनावर नियंत्रण राखण्यासाठी प्रशासनाने अत्ताच ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा शहरात वाढणार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे अतिशय अवघड होईल.

- Advertisment -

You cannot copy content of this page