Thursday, September 19, 2024
Homeक्राईमलोणावळा शहरातील गाई - गुरांच्या सुरक्षेसाठी लो. श. पो. स्टेशनला तक्रार....

लोणावळा शहरातील गाई – गुरांच्या सुरक्षेसाठी लो. श. पो. स्टेशनला तक्रार….

लोणावळा शहरातील तुंगार्ली गाव परिसरामध्ये काही अज्ञात व्यक्ती काही दिवसांपासून गाई – गुरांना इंजेकशन देऊन बेशुद्ध करत असल्याचा प्रकार सुरु आहे आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार शहरातील मोकाट गाई, गुरं बेशुद्ध करून चोरी करण्याची घटना गेली काही वर्ष सुरु असल्याचे समजत आहे, सदर जनावरे बेशुद्ध करून त्यांना चारचाकी वाहनांमधून लंपास करण्यात येते आणि हे चोरटे निगरगट्ट असून चोरी करतेवेळी एका वाहनातून धारदार शस्त्रे घेऊन येत असल्याचेही समजले आहे.

गेली काही वर्ष सुरु असलेली जनावरांची तस्करी विषयी कोणीच आवाज उचलला नव्हता त्यामुळे आत्तापर्यंत ही घटना कोणाच्याही निदर्शनास आली नव्हती, सध्यस्थितीला ही बातमी सोशल मिडीया द्वारे कळताच ह्या समाजकंटकांमुळे विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हयाच अनुषंगाने आज लोणावळा नगरपरिषदेचे मा.नगरसेवक नासिर शेख, मावळ तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष फिरोज बागवान यांच्या वतीने लोणावळा शहर पोलिस स्टेशन ला सदर अज्ञात व्यक्तीं विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सदर अज्ञात व्यक्तींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंतीही करण्यात आली आहे. सदर तक्रारीचे निवेदन लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक समिंदर करे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.आता पोलीस ह्या समाजकंटकांना पकडतात की नाही याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page