Wednesday, September 27, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळा शहरातील नागरिकांना महावितरणचा दिलासा....

लोणावळा शहरातील नागरिकांना महावितरणचा दिलासा….

लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ असून पावसाळा सुरु झाला की येथील नागरिकांना काही ना काही कारणास्तव विज पुरवठा खंडित होण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. कधी झाडे पडून विज वाहिन्या विस्कळीत होतात तर कधी खांब कोसळल्याने विज पुरवठा खंडित होत असतो वा इतर काही अंतर्गत अडचणींमुळे विज पुरवठा खंडित होण्याच्या समस्यांना लोणावळा शहरातील नागरिक व व्यावसायिक त्रस्त होत असतात. तसेच लोणावळा शहरात जवळ जवळ 35000/ मिटर धारक आहेत. व त्यांच्या विज पुरवठा संदर्भात वयक्तिक अनेक तक्रारी महावितरण कंपनीकडे येतात त्यांच्या तक्रारींचे निवारण करणार तर सार्वजनिक तक्रारी ही महावितरण कंपनीकडे येत असतात, आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्य विज महावितरण कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी सदैव तत्पर असतात परंतु लोणावळ्यात पडणारा मुसळधार पाऊस आणि जागोजागी साठलेले पाणी यामुळे त्यांना लाईनवर काम करण्यासाठी अडथळा येत असतो.

महा. विद्युत वितरण कंपनीकडे एकूण 50 /55 कायम तत्वावरचे कर्मचारी असून काही खाजगी कंपन्यांचे कर्मचारी ही आहेत. लोणावळा शहरातील नागरिकांची विजपुरवठ्यासंदर्भातील पावसाळी समस्या लक्षात घेता महा. विद्युत वितरण कंपनी नांगरगाव कडून पावसाळा कालावधीत लोणावळा शहरातील प्रत्येक प्रभागात दोन वायरमन नेमले जातात, आणि त्या दोन वायरमन ( कर्मचारी ) यांनी फक्त आपल्याकडे दिलेल्या प्रभागातील तक्रारींचे निवारण करून तेथील खंडित विज पुरवठा लवकरात लवकर कसा पूर्वस्तरावर येईल याची दक्षता घ्यायची आहे.

त्याच बरोबर काही वेळा आपल्या तक्रारी टोल फ्री नंबरवर नोंद होत नसल्याकारणाने आपल्या विज पुरवठा व बिलिंग संदर्भातील तक्रारी महावितरण च्या ग्राहक पोर्टल ऍप द्वारे करू शकता अथवा विज खंडित झाल्यास फोन नं. 9930399303 या नंबर वर NOPWER < ग्राहक क्र. >हा संदेश पाठवू शकता अशा सूचना महावितरण कंपनीकडून देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -