लोणावळा : लोणावळा भाजी मार्केट साठी नवीन प्रशस्त इमारत उभारणी करीता शासनाकडून 45 कोटींचा निधी मंजूर व्हावा अशी मागणी पत्रकाद्वारे लोणावळा नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी यांनी आमदार सुनील शेळके यांना केली आहे.
लोणावळा शहरातील नागरिकांच्या सोयीकरिता भाजी मार्केटची जुनी इमारत पाडून नवीन इमारतीची उभारणी करून त्याठिकाणी भाजी मार्केट, मच्छि मार्केट, मटण मार्केट व इतर दुकानासाठी गाळे काढण्यात येणार आहेत त्यासाठी 45 कोटींचा खर्च अपेक्षित असून तो मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी लेखी पत्रकाद्वारे आमदारांकडे करण्यात आली आहे.
लोणावळा शहरातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार शेळके यांनी लोणावळा नगरपरिषदेत एका बैठकीचे आयोजन केले होते त्यादरम्यान लोणावळा भाजी मार्केटच्या नवीन प्रशस्त इमारतीसाठी शासनाचा निधी मंजूर करून देईल असे आश्वासन आमदार शेळके यांनी यावेळी दिले होते. त्यासंदर्भातील प्रस्ताव लोणावळा नगरपरिषदेने नगरविकास विभागास पाठविला असून आमदार शेळके यांनी त्याचा पाठपुरावा करावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.