लोणावळा शहर पत्रकार संघाची मागणी…
लोणावळा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेचे नोकरी , कामधंदा नाही त्यामूळे आधीच कंबरडे मोडले असतांना त्यात मावळातील काही डॉक्टर्स व हॉस्पीटल्स जनतेची लूट करीत असल्याच्या अनेक तक्रारी पुढे येत आहे.
नुकतेच मावळचे तहसिलदार मधुसुदन बर्गे यांनी सामान्य नागरिकांची लूट करणाऱ्या सोमाटणे येथील स्पर्श हॉस्पीटल व कामशेत मधील बडे हॉस्पीटल यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उगरला असून, तसा चौकशी समितीने दिलेल्या अहवालावरून जिल्हाधिकारी यांना तसा कठोर कारवाईचा म्हणजे नोंदणीच रद्द करण्याचा अहवाल दिला आहे.
फक्त दोन तासाचे हजारो बील उकळणे, गरज नसलेल्या औषधांची सक्ती करणे , जास्तीचे औषधे देवून ते परत न घेणे आदी तक्रारीच्या पार्श्वभूमीवर सदर कारवाई महत्वाची मानली जात आहे . असेच लोणावळ्यातील काही धंदा करणारे डॉक्टर्स आणि पवित्र अशा हॉस्पीटल्स ला कुंटणखान्याचे स्वरूप देणाऱ्यांविरूध्द कठोर कारवाई करून सामान्य जनतेला दिलासा दयावा अशी मागणी लोणावळा शहर पत्रकार संघाच्या वतीने मावळचे तहसिलदार मधुसुदन बर्गे यांना लेखी निवदेन देऊन करण्यात आली आहे.