लोणावळा शहरात आढळला 37,वर्षीय तरुणीचा मृतदेह….

0
2446

लोणावळा दि.1: लोणावळा येथील शामियाना लॉजच्या बाजूला एका तरुणीचा मृतदेह दि.27 रोजी 10 वा. च्या सुमारास आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे मयत- माया रावजी जगताप, (वय 37, रा. औंढे मारुती मंदिराजवळ, लोणावळा ), हिचा मृत देह दि.27 रोजी 10 वा. च्या सुमारास शामियाना लॉजच्या बाजूस असलेल्या राजेंद्र गुलाबचंद गदीया यांच्या प्रॉपर्टीमध्ये आढळून आला.

त्यासंदर्भात अरुण आनंदा खानेकर ( वय 42, रा. फ्लॅट नं.1, शरयू अपार्टमेंट, भैरवनाथ नगर, कुसगाव, लोणावळा ), यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनला खबर दिली असता.

लोणावळा शहरचे पी. एस. आय. सांगळे ह्यांनी घटना स्थळी भेट दिली, व तेथील सर्व भाग तपासून त्यासंदर्भात लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंद क्र 24 वेळ 15:33, रजिस्टर नं. 12/2021 CRPC 174 अकस्मात मयत दाखल करण्यात आली आहे.

मयत माया हिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम सांगळे पुढील तपास करत आहेत.