Sunday, July 14, 2024
Homeक्राईमलोणावळा शहरात तरुणाची निर्घृण हत्या...

लोणावळा शहरात तरुणाची निर्घृण हत्या…

लोणावळा दि.2 : लोणावळा शहरातील इंद्रायणी नगर येथे राहणाऱ्या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे.


मयत- बिलाल फैयाज कुरेशी ( वय 28 वर्षे रा. घर. नं. 55 इंद्रायणी नगर, टेबल लॅन्ड चाळ, लोणावळा ता. मावळ जि. पुणे ) हा बंद पडलेल्या भाजी मार्केट गाळा क्रमांक 32 इथे झोपलेला असताना रात्री 10 ते सकाळी 6 वा. दरम्यान कोणी तरी अज्ञात इसमाने त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत जीवघेणा हल्ला केला त्यात गंभीर जखमी झाल्याने बीलाल याचा जागीच मृत्यू झाला आहे.

त्या संदर्भात सुल्ताना फैयाज कुरेशी ( वय वर्ष 40, व्यवसाय मटण विक्री दुकान, रा. घर क्र.55, इंद्रायणी नगर, टेबल लॅण्ड चाळ, लोणावळा ) यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून सदर फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस स्टेशनला अज्ञाता विरुद्ध भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हत्येची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक, लोणावळा उपविभाग अधिकारी नवनीत कॉवत, पो. निरीक्षक पवार यांनी घटनास्थळी पोहचून आढावा घेतला. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सदर गुन्ह्याचा तपास पो. निरीक्षक पवार हे करत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page