लोणावळा शहरात प्रथमच महिलांसाठी मोफत क्रिकेट प्राशिक्षण…

0
46
लोणावळा : लोणावळा शहरात प्रथमच महिलांसाठी मोफत क्रिकेट प्रशिक्षण.लोणावळ्यातील एस. के. स्पोर्ट्स अकॅडमि व आनंद स्पोर्ट आरेना यांच्या विद्यमाने लोणावळा मावळे चौक लगत असलेल्या मैदानात विना शुल्क मुली तसेच आवड असणाऱ्या महिलांसाठी क्रिकेट प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर क्रिकेट प्रशिक्षण कॅम्पच्या उदघाटन वेळी लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष आरोही तळेगावकर, नगरसेविका ब्रिन्दा गणात्रा इत्यादी समेट एस के अकॅडमि व आनंद स्पोर्ट अरेना चे सर्व सभासद व प्रशिक्षक उपस्थित होते. तरी लोणावळा परिसरातील सर्व इच्छुक महिला व मुलींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी सुरेखा जाधव (नगराध्यक्षा लो. न. पा.) यांनी केले असून सदर मैदानात 8 फेब्रुवारी रोजी महिला क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहेतरी सर्व प्रेक्षकांनी दि.8 रोजी उपस्थित राहून खेळाचा आनंद घ्यावा.