लोणावळा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिकांचा सन्मान..

0
83

लोणावळा दि.15: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लोणावळा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील माजी सैनिकांचा सन्मान सोहळा गवळीवाडा राममंदिर येथे आज संपन्न झाला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेस कमिटीच्या वतीने सालाबादप्रमाणे प्रथम ध्वजारोहण करण्यात आले.

तदनंतर स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्य मिळाल्या नंतर सैनिक म्हणून देशाची सेवा करणाऱ्या माजी सैनिकांना यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.तसेच कमिटीतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा करून त्यांना काँग्रेस कमिटीच्या वतीने नियुक्ती पत्रके देण्यात आली.

यावेळी लोणावळा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष निखिल कवीश्वर, उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल, नगरसेवक सुधीर शिर्के, पुजा गायकवाड, सुवर्णा अकोलकर, युवक अध्यक्ष दत्ता दळवी, सेवा दल अध्यक्ष सुनील मोगरे इत्यादी मान्यवरांसह सर्व आजी माजी पदाधिकारी, जेष्ठ कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.