Sunday, September 24, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळा शहर काँग्रेस कमिटीकडून शहरातील रुग्णालयात असलेल्या कोरोना रुग्णांना जेवणाची सोय....

लोणावळा शहर काँग्रेस कमिटीकडून शहरातील रुग्णालयात असलेल्या कोरोना रुग्णांना जेवणाची सोय….

लोणावळा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोनाची साखळी तोडण्याकरिता शासनाने लागू केलेल्या लाॅकडाऊन मध्ये हॉटेल व खानावळी बंद आहे. त्यामुळे कोरोनाचे उपचार घेणा-या रुग्णांची जेवणाभावी हेळसांड होत आहे, त्यांना वेळेवर दोन वेळचे जेवण विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यासाठी लोणावळा शहर काँग्रेस कमिटी पुढे सरसावली आहे.

कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णास विनामूल्य जेवणासाठी डब्याची सोय करण्यात येत आहे. ज्या रुग्णांना आवश्यकता असल्यास त्यांनी लोणावळा शहर काँग्रेस कमिटीच्या पुढील क्रमांकवार संपर्क करावा असे आवाहन लोणावळा शहर काँग्रेस कमिटी कडून करण्यात आले आहे.( संपर्क क्रमांक 99 75 84 14 84 व 95 27 67 09 55 )आहे.

ज्या रुग्णांना दुपारी जेवणाचा डबा हवा असेल त्यांनी सकाळी 11 वाजेपर्यंत व रात्रीच्या जेवणासाठी सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क करून कळवावे. असे आवाहन शहर काँग्रेसचे प्रवक्ते प्रमोद गायकवाड व युवक काँग्रेसचे सचिव निखील कविश्वर यांनी केले आहे.त्यावेळी मावळ तालुका उपाध्यक्ष फिरोज बागवान,लोणावळा युवक अध्यक्ष दत्ता दळवी, सेक्रेटरी मंगेश बालगुडे, पप्पू औरंगे, शुभम जोशी, अमित बारसे, विशाल गवळी, अमोल चौधरी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -