Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा शहर पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न…

लोणावळा शहर पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न…

लोणावळा (प्रतिनिधी): मराठी पत्रकार परिषदेच्या 84 व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे जिल्हा पत्रकार संलग्न लोणावळा शहर पत्रकार संघ (मावळ) पत्रकारांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर पद्मावती हॉस्पिटल लोणावळा येथे संपन्न झाले.
निर्मिती फौंडेशन च्या संस्थापिका डॉ.सिमा शिंदे यांच्या संयोजनाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुसगांव ग्रामपंचायत उप सरपंच सुरज केदारी, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर गुंड हे उपस्थित होते.
यावेळी लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष ऍड. संजय पाटील, अध्यक्ष विशाल विकारी, माजी अध्यक्ष निखिल कवीश्वर, विशाल पाडाळे, अष्ट दिशा संपादक रियाझ शेख,लोक विशेष चे संपादक अमित चनाल, पत्रकार बापूसाहेब पाटील, संदीप मोरे,श्रावणी कामत, धनु रोकडे,रोशनी ठाकूर,सुनील चव्हाण, उरकून्द, गुरुनाथ नेमाणे आदी पत्रकारांच्या उपस्थितीत प्रथम दिप प्रज्वलन करण्यात आले. पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी यांच्या हस्ते आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून आरोग्य तपासणी शिबिरास प्रारंभ करण्यात आला.
या शिबिरा मार्फत सर्व पत्रकारांचे बी पी, शुगर, पल्सची तपासणी करण्यात आली. यावेळी वीस पत्रकारांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.तसेच शिबिराच्या आयोजिका डॉ. सिमा शिंदे यांचा पत्रकार संघाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्प देऊन आभार मनन्यात आले. पत्रकार हे अहोरात्र आपले कार्य करत असतात, पत्रकार निरोगी म्हणजेच जनता निरोगी असे प्रतिपादन यावेळी डॉ. सिमा शिंदे यांनी केले. तसेच लोकशाही चा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकार बांधवांसाठी मी सातत्याने अशा शिबिराचे आयोजन करेन अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल कवीश्वर व विशाल पाडाळे यांनी केले तर आभार बापूसाहेब पाटील यांनी मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page