लोणावळा दि. 26 : मराठी पत्रकार परिषद संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघ यांच्या मार्गदर्शनाखाली आज लोणावळा शहर पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना ओळखपत्र देण्यात आले.
यावेळी लोणावळा शहर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रकांत जोशी ,जेष्ठ पत्रकार शाम मोकाशी ,श्रीराम कुमठेकर, अध्यक्ष लोणावळा शहर पत्रकार संघ Adv संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .सदर कार्यक्रमाआधी दिवंगत दत्तूभाऊ गवळी यांना लोणावळा शहर पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख ,कार्यध्यक्ष शरद पाबळे ,विभागीय सचिव बापूसाहेब गोरे पुणे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर यांचे लोणावळा शहर पत्रकार संघाच्या वतीने हार्दिक आभार मानण्यात आले.