लोणावळा शहर पोलिसांची कारवाई टपरीतून 2034 रु.किमतीचा पान मसाला जप्त…

0
739
लोणावळा दि. 30 : शहरातील बारा बंगला, स्वराज्य नगर येथील एका टपरीवर छापा मारून लोणावळा शहर पोलिसांनी 2034 / रु. किमतीचा विमल पान मसाला जप्त करून टपरी चालक ईस्माईल अमीर शेख ( वय 81, रा. समता नगर, वलवण, लोणावळा ) याच्या विरोधात गु. र. नं. 461/2020, महाराष्ट्र गुटखा बंदी व अन्न सुरक्षा कायदा, नियम 2006 चे कलम 26(2) (iv) 27, सहवाचन कलम ( 30)(2) 59, भा. द. वि. कलम 188, 273 प्रमाणे लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी ईस्माईल शेख याने त्याच्या बारा बंगला, स्वराज्य नगर येथील टपरीत विमल पान मसाला विक्रीसाठी ठेवला असताना पोलीस कारवाईत मिळून आला.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत 2034 /रु. की. पान मसाला पोलिसांनी जप्त केला आहे. त्यासंदर्भात लोणावळा शहरचे उपनिरीक्षक बळीराम सांगळे यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून ठाणे अंमलदार पो. हवा. जांभळे यांनी गुन्हा नोंद करून घेतला. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा अहवाल मा. न्यायदंडाधिकारी सो वडगाव मावळ यांच्याकडे रवाना केला असून पुढील तपास पो. ना. नांगरे करत आहे.