(लोणावळा प्रतिनिधी )
लोणावळा : दि. 2 रोजी, एका अवैध दारू विकणाऱ्याला आपल्या मोटर सायकल वरून दारू नेत असताना लोणावळा एस टी स्थानक येथे लोणावळा शहर पोलिसांनी रंगेहात पकडले.
लॉकडाऊन कालावधीत अनेक लोकांचे रोजगार बुडाले त्यामुळे अनेकांच्या मनात पैसे कमविण्याचे काही ना काही पर्याय येऊ लागले त्यात काही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना मात्र बेकायदेशीर धंदेच सुचतात असाच एक तरुण अवैध दारू विक्रीसाठी नेत असताना लोणावळा एस टी स्टॅन्ड येथून पोलिसांना मिळून आला. या संदर्भात लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पो.कॉ.राहुल खैरे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वरून सुरेश चव्हाण, वय 22, रा. बी व्ही टी आगवाली चाळ लोणावळा हा त्याची मोटर सायकल नं. एम एच 14 ई एल 9893 ह्यावरून 1980 रु. किंमतीचा बियर बॉक्स नेत असताना मिळून आला त्यावेळी 1980 रु. की.चा बियर बॉक्स व अंदाजे 30, 000 रु. किमतीची होंडा कंपनीची मोटर सायकल असा एकूण 31, 980 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी विरोधात लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्रोव्हीशन कलम 65(ई )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मनोज कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वैभव सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल मोरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खैरे, पोलीस कॉन्स्टेबल अजीज मेस्त्री, पोलीस कॉन्स्टेबल पवन कराड यांनी ही कारवाई पार पाडली.