Saturday, September 21, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा शहर पोलिसांची धडक कारवाई खंडाळा येथे 6425 रु.शिंदी जप्त, एकावर गुन्हा...

लोणावळा शहर पोलिसांची धडक कारवाई खंडाळा येथे 6425 रु.शिंदी जप्त, एकावर गुन्हा दाखल…

लोणावळा (प्रतिनिधी): खंडाळा परिसरात अवैधरित्या शिंदी साठवल्या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 6,425 रु. किमतीचा माल व साहित्य जप्त करण्यात आले आहे. लोणावळा शहर पोलिसांनी सोमवार दि.7 रोजी सायंकाळी 5:45 च्या सुमारास खंडाळा येथे ही कारवाई केली .
आरोपी प्रकाश रामा माडे (वय 35, रा. खंडाळा ) याच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गु र नं 167/2022, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65( फ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील जगदीश पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी प्रकाश रामा माडे (वय 35, रा.ठाकरवाडी, खंडाळा, ता. मावळ ) याने दि . 7 रोजी 5:45 वा .च्या सुमारास ठाकरवाडी,खंडाळा येथे घराजवळ असलेल्या नगरपालिकेच्या जागेवर भिंतीच्या आडोशाला शिंदी साठवण केलेला मिळून आला.
सदर कारवाईत एक निळ्या रंगाचे प्लॅस्टीकचे बॅरेल त्यात सुमारे 200 लिटर आंबट उग्रवासाची शिंदी रु.5400 किंमतीची,प्रत्येकी 25 रु लिटर प्रमाणे, एक काळे रंगाचा प्लॅस्टीक कॅन्ड त्यात सुमारे 35 लिटर, रु.875 किंमतीची आंबट उग्रवासाची शिंदी प्रत्येकी 25 रु लिटर प्रमाणे, एक प्लॅस्टीकचा टप त्यामध्ये सुमारे 06 लिटर आंबट उग्रवासाची शिंदी प्रत्येकी 25 रु. लिटर प्रमाणे फुगे रु.150 रु. किमतीचे असा एकूण 6425 / -रु किमतीचा माल व साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार घोटकर हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page