लोणावळा शहर पोलिसांनी तीन दिवसात 581 जणांवर केलेल्या कारवाई 13 पर्यटकांवर खटले दाखल…

0
537

लोणावळा : लोणावळा शहर पोलिसांनी दि. 29 ते दि. 31 ह्या तीन दिवसात एकूण 581 जणांवर कारवाई केली असून 13 पर्यटकांवर भादवि कलम 188, 269 प्रमाणे खटले दाखल करत 2 लाख 90 हजार 500 रुपये दंड वसुल केला आहे.


लोणावळा शहरातील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून नागरिकांकडून मात्र नियमांचे उल्लंघन अगदी सर्रासपणे होताना दिसत आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला आवर घालण्यासाठी लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मनोज कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलिसांनी मास्क न लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे इत्यादी संदर्भात तीन दिवस कारवाई केली.तीन दिवसात तब्बल 581 जणांवर दंडात्मक कारवाईत करत 13 पर्यटकांवर भा द वि कलम 188, 269 प्रमाणे खटले दाखल केले असून एकूण 2 लाख 90 हजार 500 रुपये दंड वसुल केला आहे.


शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी मास्क न लावता घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा असे आवाहन लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.