Friday, June 14, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला ओळकाईवाडी येथे मारहाण…

लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला ओळकाईवाडी येथे मारहाण…

लोणावळा (प्रतिनिधी): भांडणातील आरोपीला तपासाकामी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची समज दिल्याचा राग मनात धरत लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अजीज मेस्त्री याला लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आठ ते दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना 29 जानेवारी रोजी रात्री 1.15 वाजण्याच्या सुमारास कुसगाव ओळकाईवाडी येथील मंदिराच्या पाठीमागे असलेल्या रोडवर घडली.
याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे अजिज मेस्त्री यांनी फिर्याद दिली असून. याप्रकरणी अतुल गौड, दिनेश मरवडी, आकाश चोर, विनायक शिंदे, प्रशांत शिंदे, वैभव साठे व इतर 2 ते 3 अज्ञात व्यक्ती (सर्व रा. ओळकाईवाडी कुसगांव ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये 29 जानेवारी रोजी भा.द.वि. कलम 324 अन्वेय गुन्हा दाखल झाला होता. त्यामधील आरोपी अतुल गौड यास गुन्हयाचे तपासकामी पोलीस स्टेशन येथे हजर राहण्याची समज दिल्याचा राग मनात धरून विनायक शिंदे याने हातातील दगडाने डोक्यात मारले व वैभव साठे याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करून गंभीर दुखापत केली व इतरांनी हाताने लाथाबुक्याने मारहाण केली असल्याचे मेस्त्री यांनी फिर्यादीमध्ये म्हंटले आहे.
या मारहाणीत मेस्त्री यांच्या डाव्या डोळयाच्या खालील बाजुस फॅक्चर झाले असून नितीन नरवडे यालाही हाताने मारहाण झाली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आज 1 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कारंडे पुढील तपास करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page