if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी) : लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग असलेल्या इसमाचा दहा दिवसानंतर वलवण हद्दीत रेन्बो हॉटेलच्या समोर, रानवारा हॉटेलच्या बाजूला, दलदलीमध्ये मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
विनोद नगरमल कुमार (वय 50, रा. रामबाग छत्री बंगला, कृष्णा कुंज (A) विंग 1006, कल्याण, मुंबई ) असे मयताचे नाव असून. सध्या कामासाठी खंडाळा येथे राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल बुधवार दि.9 रोजी सायंकाळी 6 वा. च्या सुमारास खबर देणार रामलाल मोती यांनी खबर दिली की हॉटेल रानवारा जवळील दलदलीच्या गाळात एका पुरुषाचे प्रेत आढळून आले आहे. माहिती मिळताच पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदर प्रेत हे आठ ते दहा फूट दलदलीच्या पाण्यामध्ये पडल्याचे दिसले तसेच आजूबाजूला झाडेझुडपे, मोठ्या प्रमाणामध्ये गवत असल्याने त्या ठिकाणी पोहोचणे शक्य नसल्याने शिवदुर्ग रेस्क्यू टीमशी संपर्क करून बोलावून घेतले यावेळी शिवदुर्गं टिमचे सुनील गायकवाड व त्यांचे सहकारी यांच्या मदतीने अथक प्रयत्न करून सदर प्रेत बाहेर काढण्यात आले.याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मयत रजिस्टर नंबर 52/2022 दाखल करून सदर प्रेत खंडाळा येथे शवविच्छेदणासाठी पाठविण्यात आले असून सदर इसम हा दि. 30/10/2022 रोजी मिसिंग असल्याची फिर्याद लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली होती. सदर इसमाचे आज प्रेत मिळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
शिवदुर्ग टिमचे सुनील गायकवाड व सहकारी यांच्या बरोबर लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बावकर,पोलीस नाईक डुंबरे,पोलीस कॉन्स्टेबल मदने,पोलीस कॉन्स्टेबल उगले यांनी शिवदुर्ग टिमला सहकार्य केले.