Saturday, September 21, 2024
Homeक्राईमलोणावळा शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध व प्रकटीकरण पथकाची चित्तथरारक कामगिरी...

लोणावळा शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध व प्रकटीकरण पथकाची चित्तथरारक कामगिरी…

(मावळ प्रतिनिधी : संदीप मोरे) दि. 21, रोजी – पुणे परिसरातील अट्टल चोरट्याला लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने चित्त थरारक सापळा रचून नागफणी डोंगर खंडाळा येथील वाघजरीच्या घनदाट जंगलातून ताब्यात घेतले.अटक केलेला चोरटा नामे बिबिषण उर्फ बाब्या जालिंदर जगताप ( वय 42, रा. 220 मंगळवार पेठ, पुणे ) हा पुणे परिसरातील अट्टल चोरटा असून परिसरात त्यावर 60 ते 70 गुन्हे दाखल आहेत.


लोणावळा शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार खंडाळा येथील एक बंद बंगला फोडून त्यातील किमती ऐवज व इतर सामानाची चोरी केलेला चोरटा बाब्या जगताप हा नागफणी खंडाळा येथील वाघजरी डोंगराच्या कपारीत तळ ठोकून बसला असल्याची माहिती लोणावळा शहर गुन्हे शोध पथकाला गुप्त सूत्रांमार्फत मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर गुन्हे शोध पथक व प्रकटीकरण पथकातील पोलीस नाईक वैभव सुरवसे, पोलीस कॉ. अजीज मेस्त्री, पोलीस कॉ. राजेंद्र मदने, पोलीस कॉ. पवन कराड, पोलीस कॉ. राहुल खैरे, पोलीस कॉ. मनोज मोरे व पोलीस मित्र यांच्या पथकाने सशस्त्र व बचावात्मक साहित्यानिशी वाघजरीच्या घनदाट जंगलात मुसळधार पाऊस आणि अंगाला चिरणारा वारा यात सलग दोन तास पायपीट करून डोंगराच्या कपारीत तळ ठोकून बसलेल्या बाब्या जगताप याला.

चित्तथरारक पाठलाग करता अगदी सिने स्टाईलमध्ये ताब्यात घेऊन त्याकडील एकूण 38, 000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक वैभव सुरवसे करीत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page