![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी):जागतिक कामगार दिनानिमित्त लोणावळा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर व श्रद्धा रक्तपेढी, लोणावळा व DONATE A LIFE यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, पोलिस निरीक्षक सिताराम डुबल,मनसे अध्यक्ष भारत चिकणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी स्वतः शिबिरास भेट दिली व रक्तदान केले.
त्याच बरोबर हिंदू समिती सदस्य सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरास तब्बल 69 रक्तदात्यानी रक्तदान केले.याप्रसंगी विशाल पाडाळे, सुरेश जाधव,पत्रकार संजय पाटील,विशाल विकारी,बंडू येवले,कुरवंडे उपसरपंच विशाल कडू , ह भ प गोकुळभाऊ भुजबळ, बाळकृष्ण चिकणे, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य हर्षल होगले,अमित भोसले, निखिल भोसले, निखिल सोमण, उमेश बोडके, सुनिल भोंडवे, दिनेश कालेकर, मधुर पाटणकर, रोहिदास शिंदे,लोणावळा नगरपालिका कर्मचारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.