लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या अध्यक्ष पदी डॉ.डॉली अगरवाल…

0
178
लोणावळा : राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहर (ब्लॉक ) डॉ. सेलच्या अध्यक्षपदी शहरातील कोरोना योद्या मानल्या जाणाऱ्या डॉ. डॉली अगरवाल यांची नियुक्ती.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. डॉली अगरवाल यांची गेली पंधरा महिन्यांची कारकीर्द लक्षात घेऊन त्यांची लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याबद्दल डॉ. डॉली अगरवाल यांना राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहर कडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सदर निवडीचे नियुक्ती पत्रक लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जिवन गायकवाड यांनी दिले त्याचबरोबर पुढील आयुष्यात अशीच रुग्ण सेवा होत राहू यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.