लोणावळा शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनमधील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

0
1918

लोणावळा दि. 1: पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पोलीस दलातील तब्बल 48 पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये 16 पो. निरीक्षक, 13 सहा. पो. निरीक्षक तर 19 पो. उप निरीक्षकांचा समावेश आहे.

त्याप्रमाणे लोणावळा शहर पोलीस स्टेशन मधील पो. निरीक्षक मनोजकुमार यादव यांची बदली होऊन त्याठिकाणी दिलीप शिशुपाल पवार हे लोणावळा शहर पो स्टेशनचे पो. निरीक्षकाचा पदभार स्वीकारणार आहेत. तसेच लोणावळा शहर पो. स्टेशनचे सहा. पो. निरीक्षक वैभव स्वामी, पो. उप निरीक्षक मृगदीप गायकवाड तर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहा. पो.निरीक्षक निरंजन रणवरे इत्यादी अधिकाऱ्यांच्या शासकीय आणि विनंती बदल्यांचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी काढले आहेत.