
लोणावळा दि.4: लोणावळा शहर महिला आघाडी शिवसेना प्रमुख पदी लोणावळा नगरपालिकेच्या कार्यक्षम नगरसेविका कल्पना गंगाराम आखाडे यांची नुकतीच निवड करण्यात आली.महाराष्ट्रात शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन करून सरकार बनवले असून मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आहेत त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना झपाट्याने वाढत असून लोणावळा शहरातही शिवसेनेच्या संघटना मोठ्या प्रमाणात आहेत.
कल्पना आखाडे ह्या शिवसेनेच्या लोणावळा नगरपालिकेच्या कार्यक्षम नगरसेविका आणि माजी बालकल्याण सभापती आहेत त्यांनी नगरपालिका आणि लोणावळा शहरात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला असून त्यांच्या कार्याची दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपनेते समनव्यक रविंद्र निर्लेकर, शिवसेना उपनेत्या मीना कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.त्यांची निवड होताच सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे, लोणावळा शहरात शिवसेनेच्या संघटना वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे विद्यमान शहराध्यक्षा कल्पनाताई आखाडे यांनी सांगितले.