लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने पाच दिवस शिवभोजन थाळी मोफत !

0
125

लोणावळा : मावळ लोकसभेचे खासदार,संसदरत्न श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने आजपासून पाच दिवस नागरिकांना ” मोफत शिवभोजन थाळी चे वाटप ” करण्यात येणार आहे .

खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने पुढील पाच दिवस शिवभोजन थाळीचे मोफत वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांनी सांगितले .यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांच्यासह, शिवदास पिल्लै , समन्वयक जयवंत दळवी , युवासेना तालुका अधिकारी शाम सुतार , उपशहरप्रमुख मनेष पवार , उपशहरप्रमुख संजय भोईर , महिला उपतालुका संघटीका संगिताताई कंधारे , विभागप्रमुख भगवान देशमुख, उपविभागप्रमुख नागेश दाभाडे , शिवसैनिक श्रीकांत कंधारे , दिगंबर कारंडे , धीरज घारे यांसमवेत शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.