Wednesday, September 27, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले...

लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले…

लोणावळा शहरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. तसेच शहरातील कोविड रुग्णालय ( संजिवनी हाॅस्पीटल ) मध्ये सोयीसुविधा अपुऱ्या असल्यामुळे कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे.
अपुऱ्या सुविधांमुळे परिसरातील अनेक कोरोना बाधित रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तरी लोणावळा शहरातील कोविड हाॅस्पीटल मधे तज्ञ डाॅक्टर, पुरेसा औषध पुरवठा, व्हेंटिलेटर व कार्डियाक रुग्णवाहिका या सुविधा रुग्णासाठी लवकरात लवकर उपलब्ध करुन द्या यासाठी लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवी पवार यांना निवेदन देण्यात आले व कोविड 19 चा शहरातील वाढता प्रभाव लक्षात घेत उपाययोजना संदर्भात मुख्याधिकारी यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली.

यावेळी लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक , शहर समन्वयक जयवंत दळवी जेडी , उपशहरप्रमुख संजय भोईर, उपशहरप्रमुख मनेष पवार, युवासेना मावळ समन्वयक शाम सुतार, विभागप्रमुख कमर अन्सारी, मंगेश येवले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
- Advertisment -