Sunday, June 2, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा श्री स्वामी समर्थ शंकर चिले सेवा परिवाराचे वतीने समर्पण ध्यानयोग शिबिराचे...

लोणावळा श्री स्वामी समर्थ शंकर चिले सेवा परिवाराचे वतीने समर्पण ध्यानयोग शिबिराचे आयोजन..

लोणावळा येथील श्री स्वामी समर्थ शंकर चिले सेवा परिवारा तर्फे ता.२१/०३/२०२१ रोजी सुमित्रा हॉल भांगरवाडी लोणावळा येथे सायंकाळी ०४:०० ते ०६:०० असा परिवाराचे निवडक ५० सदस्या करिता श्री शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशन नवसारी गुजरात व योगप्रभा भारती संस्था मुंबई यांचे वतीने समर्पण ध्यानयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी परिवाराच्या वतीने श्री शिवकृपानंद स्वामी यांना मानपत्र बहाल करण्यात आले, या शिबिरामध्ये समर्पण पुणे येथील श्री आशिष कालावार,ऋता कालावार, धीरज अहिरे, दीपाली चव्हाण हे उपस्थित होते त्यांनी परिवारातील सदस्यांना सध्या व सोप्या पद्धतीने समर्पण ध्यान कसे करावयाचे याचे मार्गदर्शन केले कोरोना चे अनुषंगाने सदरचा कार्यक्रमा मध्ये प्रशासनाचे सर्व नियम पाळण्यात आले याप्रसंगी बोलताना श्री आशिष कालावार म्हणाले की, समर्पण ध्यान एक अतिशय सोपी ध्यान पद्धत आहे.

यामध्ये ३५ हुन अधिक देशांमध्ये साधक ध्यान करतात. जिवंत अनुभूतीवर आधारित ही ध्यान पद्धत असून जणूकाही ध्यान संस्कारच आहे. ज्या मुळे मनुष्याचा आंतरिक विकास होण्यास मदत होते.यामध्ये कुठली जाती-धर्म-भाषा-देश-लिंग यांचे कसलेही बंधन नाही. कोणीही सामान्य मनुष्य सुद्धा या ज्ञानाचा अनुभव घेऊ शकतो आणि आपली प्रगती करू शकतो, ध्यानामुळे तणावमुक्त राहता येते हे सर्व जगाला माहित आहे. त्याच बरोबर आणखी काही फायदे या समर्पण ध्यानामुळे साधकांना होऊ शकतात.ध्यानामुळे विचार शून्यता सहजरित्या येते, ज्यामुळे मनाची जागरूकता आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.


मन एकाग्र व संतुलित झाल्याने आपण भय, दुःख , व्यसन व आत्मग्लानीपासून मुक्त होऊ शकतो. सकारात्मकता वाढीस लागते, आत्मविश्वास जागृत होतो व सुदृढ होण्यास मदत होते.
‌नियमित समर्पण ध्यानाने मानसिक व शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपण रोग व व्याधींपासून मुक्त होऊ शकतो.नियमित ध्यान केल्याने मनाची एकाग्रता स्थिरता जागरूकता व आत्मविश्वास वाढतो. सृजनात्मक शक्ती जागृत होत असल्याने जीवनात सर्वांगीण विकास होतो.


हे सर्व ‘श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन’, नवसारी यांच्या मार्फत आयोजित केले जाते जे ‘योगप्रभा भारती सेवा संस्था ट्रस्ट’, मुंबई यांच्याशी संलग्न आहेत.तसेच समर्पण ध्यान पूर्णतः निशुल्क आहे. समर्पण ध्यान करण्यासाठी कसलेही बंधन नाही. काहीही सोडायचे नाही. फक्त आपल्या दैनंदिन जीवनात अर्धा तास ध्यान जोडून घ्यायचे असते.


या शिबिरासाठी लोणावळा नगरपरिषदेचे नगरसेवक श्री श्रीधर पुजारी यांनी विनामूल्य सुमित्रा हॉल उपलब्ध करून दिला, तसेच श्री परशुराम पोतनीस, कृष्णाई रिसॉर्ट चे श्री गोल्डी खंडेलवाल, श्री रवी स्टीफन, बुराख आर्ट चे श्री ताजुदिन, बापूसाहेब साबळे यांचे सहकार्य लाभले याप्रसंगी परिवाराचे अध्यक्ष श्री मनोहर निकम, उपाध्यक्ष श्री अरुण फाटे, सचिव कु नीलिमा शेडगे, अनंता टेमगिरे, खजिनदार श्री विनायक म्हसकर, जान्हवी कसबेकर, सुनील दळवी, मिलिंद शिरस्कर, उमेश गाडे, तसेच श्री बापूसाहेब साबळे, संतोष दाभाडे, गोपी म्हसकर, विजय ठाकर, राम आखाडे, राजाराम बिरंजे, विशाल जाधव, नितीन शेलार, श्रीकांत घोडके, अनंत वाळंज, कुमार जाधव मामा, श्री सुरेश तावरे, श्रीमती कल्पना घोणे, स्वाती दाभाडे, संगीता घोडके, पल्लवी गाडे, श्रद्धा मावकर असे उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page