लोणावळा सलग सुट्यांमुळे वरसोली टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा…

0
68

लोणावळा दि.17: नवरात्र उत्सवानंतर विजयादशमीची सुट्टी लागताच विकेंड सुट्ट्या सलग लागल्याने पर्यटकांनी लोणावळ्यात गर्दी केली असून वरसोली टोल नाक्यावर लांबच लांब रांगा लागलेले चित्र आज पाहायला मिळाले.मागील दोन वर्षांपासून नागरिक व पर्यटक सूट्ट्याची धमाल करण्याच्या प्रतीक्षेत होते. आता मागील महिन्यापासून पर्यटनावरील बंदी हटली व नवरात्रउत्सवाच्या प्रश्वभूमीवर सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली झाली त्यात प्रामुख्याने मावळातील ऐतिहासिक कार्ला एकविरा देवी मंदीर, खंडाळा येथील वाघजाई देवी मंदीर खुली झाली आहेत.

त्यातच दसरा आणि विकेंडच्या सुट्ट्या सलग लागल्यामुळे मुंबई पुणे येथील पर्यटकांचा मावळात वेग वाढला असल्याने लोणावळा गवळीवाडा व वरसोली टोल नाका येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.त्यामुळे स्थानिकांना मात्र बघ्याची भूमिका घ्यावी लागत आहे.


वाहतूक सुरळीत करण्यासाठी लोणावळा पोलीस प्रशासनाकडून नियोजन सुरु असले तरी वाहनांच्या अलोट गर्दीमूळे प्रशासन हतबल होत असल्याचे चित्र आज दिसत आहे.